January 4, 2025 7:35 PM January 4, 2025 7:35 PM
3
इक्वेडोरमध्ये ६० दिवसांची आणीबाणी जाहीर
इक्वेडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी, तिथे अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्ष सुरु असलेल्या सात प्रांत आणि तीन नगरपालिका क्षेत्रात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि संघटित सशस्त्र गटांची वाढतं प्रमाण ही आणीबाणीची लागू करण्यामागची मुख्य कारणं असल्याचं नुबा यांनी सांगितलं. यासोबतच आणखी २० ठिकाणी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली असल्याचं वृत्त तिथल्या माध्यमांनी दिलं आहे.