November 16, 2024 6:39 PM November 16, 2024 6:39 PM

views 11

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक-ECI

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगानं राजकीय प्रचार जाहिरातींसाठी नियमावली ठरवून दिली आहे. यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. याकाळात दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करायच्या राजकीय जाहिराती, बल्क एसएमएस, व्हॉइस मेसेज, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावरच्या जाहिरातींचंही पूर्व-प्रमा...

November 16, 2024 6:34 PM November 16, 2024 6:34 PM

views 54

प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी BJP आणि Congress अध्यक्षांवर ECI च्या नोटिसा

महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी याबद्दल प्रतिसाद द्यावा, असं आयोगानं नोटिशीत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी २२ मे रोजी जारी केलेल्या सूचनांचं पालन करून दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारक आणि नेत्यांनी प्रचार...

September 28, 2024 11:09 AM September 28, 2024 11:09 AM

views 16

केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पथकानं आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निवडणूक आयोगानं चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह खात्याचे अतिरीक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.  त्यानंतर नि...

September 23, 2024 2:12 PM September 23, 2024 2:12 PM

views 52

केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर गेलं आहे. या पथकात  निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश आहे.  निवडणूक आयोगाचं पथक विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत रांची इथं बैठक घेत आहे. भाजपा, काँग्रेस आणि माकप या राष्ट्रीय पक्षांसह झारखंड मुक्ती मोर्चा, राजद आणि आजसू हे प्रादेशिक पक्ष आपली मतं निवडणूक आयोगापुढे मांडत आहेत. यानंतर निवडणूक आयोगाच...