September 19, 2025 8:10 PM September 19, 2025 8:10 PM

views 43

एकही निवडणूक न लढवलेल्या ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकलं आहे. गेल्या सहा वर्षात या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगानं अशा इतर ३३४ पक्षांवर कारवाई केली होती.    गेल्या तीन आर्थिक वर्षांत वार्षिक लेखापरीक्षणाचे अहवाल सादर न केल्यामुळे ३५९ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. या अह...

August 17, 2025 8:32 PM August 17, 2025 8:32 PM

views 14

बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले

बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणाच्या प्रक्रीयेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सांगितलं की मतदारयाद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रीयेत एक कोटीपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी, १० लाखापेक्षा जास्त बूथ एजंट आणि २० लाखाहून जास्त मतदान एजंट सहभागी झाले होते. असं असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  राजकीय पक्षांचे एजंट प्रत्यक्ष प्रक्रीयेत सहभागी असूनही पूर्ण माहिती वर...

August 14, 2025 12:56 PM August 14, 2025 12:56 PM

views 2

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक पणावर आघात केल्यासारखं असल्याचं त्यांंनी म्हटलं आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्त्व पहिल्या  निवडणुकीपासून लागू असून बोगस मतदानाच्या तक्रारी पुराव्यानिशी सादर केल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे एका व्यक्तीने दोनदा मतदान केल्याचा पुरावा असल्यास तो आयोगाकडे सादर करावा. असंही त्यांनी म्हटलं आहे.

May 25, 2025 1:33 PM May 25, 2025 1:33 PM

views 28

पाच विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून असून १९ जून रोजी मतदान तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.    गुजरातमध्ये २, तर उर्वरित राज्यांमधल्या प्रत्येकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 

May 2, 2025 1:08 PM May 2, 2025 1:08 PM

views 17

मृत विषयक नोंदी थेट भारताच्या महानिबंधकांकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेण्याचा ECI चा निर्णय

मतदार याद्या अधिकाधिक अचूक असाव्यात या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं मृतृविषयक नोंदी थेट भारताच्या महानिबंधकांकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना नोंदणीकृत मृत्यूंबद्दलची माहिती वेळेवर उपलब्ध होईल, तसंच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मृत्यूपश्चात नाव वगळण्यासाठीच्या अर्ज क्र. ७ ची वाट न पाहता प्रत्यक्ष भेट देऊन माहितीची पडताळणी करणं शक्य होईल.    मतदार माहिती विषयक चिठ्ठ्यांची संरचना बदलून, त्यावरची मतदाराचा अनुक्रमांक आणि भाग क्रमांक ह...

March 11, 2025 8:37 PM March 11, 2025 8:37 PM

views 52

केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांकडून मागवल्या सूचना

देशातली निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रीयेत काही अडचणी असल्यास येत्या ३० एप्रिलपर्यंत कळवाव्या असं पत्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना लिहीलं आहे. सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी वेळोवेळी राजकी...

March 2, 2025 4:49 PM March 2, 2025 4:49 PM

views 14

निवडणूक आयोग यापुढं पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार

निवडणूक आयोगातर्फे मतदारांना देण्यात येणारे एपिक नंबर एकाच वेळी दोन मतदारांना दिले गेले असल्यास त्यामुळे बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा खुलासा केला आहे. एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात, वेगळ्या विधानसभा मतदारसंघात, आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नोंदलेलं आहे.   यापूर्वी ...

February 18, 2025 3:16 PM February 18, 2025 3:16 PM

views 29

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं अशोभनीय – राहुल गांधी

निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं, प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना अशोभनीय असल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.   सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं काल रात्री या निवडीसाठी आयोजित केलेली बैठक पुढं ढकलण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती. आपलं मत वेगळं असल्याचं पत्रही निवड समितीला दिलं होतं, असं त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. ते निवड सम...

February 18, 2025 3:45 PM February 18, 2025 3:45 PM

views 1.9K

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयाने जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे. नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले...

November 16, 2024 8:34 PM November 16, 2024 8:34 PM

views 36

पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध रोकड, सोनं, चांदी आणि दारू यासारखा मुद्देमाल जप्त केला आहे.   मुंबईतल्या वाशी चेकनाक्यावर आज एका ट्रकमधून सुमारे साडे आठ हजार  किलो चांदी जप्त केली. या चांदीचं  बाजारमूल्य अंदाजे ८० कोटी रुपये इतकं आहे. नागपूर मधे मुंबईहून आलेल्या पार्सलमधून सुमारे १ कोटी ६३ लाख रुपयांचे सोनं, चांदी आणि  हिऱ्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली.    जळ...