October 17, 2024 7:13 PM October 17, 2024 7:13 PM
11
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात दांडेगाव आणि परिसरामध्ये आज दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, मात्र त्याची नोंद अद्याप झाली नाही, अशी माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून देण्यात आली. या परिसरात गेल्या चार वर्षांपासून असे धक्के बसतात. आज दुपारी २ वाजून १० मिनिटांनी आणि नंतर दोन वाजून १९ मिनिटांनी भूगर्भातून गूढ आवाज येत जमीन हादरल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितलं. हा आवाज येताच नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपाची रिक्टर स्केल नोंद मात्र अद्याप समजू शकली नाही. या अगोदर १० जुल...