September 28, 2024 1:02 PM September 28, 2024 1:02 PM
2
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. भौतिक, सागरी आणि डिजिटल संपर्क सुधारण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली, तसंच क्षमता विकास, कौशल्य विकास यावरही भर देण्याबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्सचा विकास करणं हा सामूहिक संकल्प असल्याचंही ते म्हणाले.