September 9, 2024 3:54 PM September 9, 2024 3:54 PM

views 10

यवतमाळमधे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ३६ महिला बचत गटांना ई-रिक्षाचे वितरण

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचं वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन राठोड यांच्याहस्ते गौरविण्यात आलं. जिल्ह्यात माविमच्या महिला बचत गटाला ५०० ई-रिक्षा वितरीत करण्यात येतील तसंच वटफळी गावाजवळ महिला बचत गटाकरता गारमेंट क्लस्टर उभारण्यात येईल असं राठोड यांनी सांगितलं.