October 28, 2024 1:10 PM October 28, 2024 1:10 PM
1
डिस्लेक्सिया आजाराबद्दल जनजागृतीसाठी सरकारी कार्यालये उजळली
डिस्लेक्सिया आजाराबद्दल जनजागृतीसाठी आज देशाच्या महत्त्वाच्या इमारतींवर तसंच सरकारी कार्यालयावर लाल दिवा लावण्यात आला आहे. जागतिक स्तरावर ऑक्टोबर महिना हा डिस्लेक्सिया जागरुकतेसाठी पाळला जातो. या आजाराविषयीचे गैरसमज दूर करून जागरुकता वाढवणं आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांप्रति सहानुभूतीची भावना निर्माण करणं, हा यामागचा उद्देश आहे. यानिमित्ताने नवी दिल्ली इथे विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत वॉक फोर डिस्लेक्सियाचं आयोजन करण्यात आलं होतं.