October 2, 2025 3:13 PM October 2, 2025 3:13 PM
63
देशभरात विजयादशमीचा उत्साह
आश्विन शुद्ध दशमी - विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शस्रपूजा करून साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते. मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे. पिकांचं आणि फूलपिकांचं नुकसान झाल्यामुळे फुलं तोरणं यांच्या प्रमाणात घट झाली आहे. विजया दशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटलं ...