January 2, 2025 2:34 PM

views 16

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल अविर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून, संयुक्त अरब अमिरातीतल्या १५ हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित करण्यासाठी सहाय्य करण्यात आलं. चार महिने चाललेल्या या कार्यक्रमात भारतीय वाणिज्य दूतावासानं २ हजार ११७ पारपत्र आणि ३ हजार ५८९ आपत्कालीन प्रमाणपत्र जारी केली. या दरम्यान ३ हजार ७०० पेक्षा जास्त लोकांना य...

November 25, 2024 7:26 PM

views 14

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका उपक्रमाचं दुबईत उद्घाटन

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं. अमर्याद क्षितिजे ही यावर्षीच्या या उपक्रमाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मंचाचे उद्दिष्ट तंत्रज्ञान, वित्त, शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एका व्हिडिओ  संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केलं.   भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधाना जगामध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याचे मॉडेल म्हणून पाहि...

November 10, 2024 7:53 PM

views 6

‘दुबई’ शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये सर्वोच्च स्थानावर, जागतिक पातळीवर पाचव्या स्थानी

ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ या अहवालाच्या आकडेवारीनुसार दुबई हे शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमधून प्रथम क्रमांकावर असलेलं शहर म्हणून उदयाला आलं असून सलग दोन वर्षं ते सर्वोच्च स्थानावर आहे. सिंगापूर, लॉस एंजेलिस, सिडनी, सॅन फ्रान्सिस्को, ॲमस्टरडॅम अशा शहरांना मागे टाकून दुबईने जागतिक पातळीवर पाचवं स्थान पटकावलं आहे. जागतिक व्यापार केंद्र म्हणून दुबईचं स्थान आणि मजबूत अर्थव्यवस्था हे यामागचं कारण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.