October 17, 2024 11:05 AM

views 12

राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या मालावी दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॉरिटॅनियाचे अध्यक्ष मोहंमद औल्ड घझौनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.   राष्ट्रपतींनी काल शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेतही भाग घेतला. उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी चार संयुक्त सहकार्य करारांवरही काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय शांतता आ...

September 18, 2024 8:01 PM

views 10

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक – राष्ट्रपती

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग हा फक्त देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा नसून महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखील आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज जयपूर इथे मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अठराव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. अलिकडच्या काळात देशात मुलींच्या नोंदणीत वाढ होणं ही आनंदाची बाब असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

July 16, 2024 6:45 PM

views 25

राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.