July 8, 2024 6:16 PM

views 21

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणी आणि नाक्यानाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात, अशी सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचं प्रमाण वाढवावं, मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करण्यात यावा आणि वारंवार नियम मो...