January 8, 2025 7:07 PM January 8, 2025 7:07 PM
11
‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या, न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी, समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचं दुष्कर्म करत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढं या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असं फडनवीस म्हणाले. यावेळी वनमंत्री गणेश ...