July 31, 2025 2:39 PM July 31, 2025 2:39 PM

views 9

मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीची ८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी   दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.   बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून तब्बल दोन किलो तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉकहूनचं आलेल्या इंडिगोच्या एका प्रवाशाकडून ६ किलो वीड जप्त करण्यात आलं. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. 

April 11, 2025 3:37 PM April 11, 2025 3:37 PM

views 18

रोहिना गावातून अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी २ आरोपींना अटक

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या  रोहिना गावातून ८ एप्रिलला जप्त करण्यात आलेल्या १७ कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी  २ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.   रोहिना गावात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या शेतात उभारण्यात आलेल्या अंमली पदार्थ बनवण्याच्या  कारखान्यावर छापा टाकून अंमली पदार्थ नियंत्रक पथकानं या प्रकरणी कारवाई केली असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

March 27, 2025 2:58 PM March 27, 2025 2:58 PM

views 13

महाड वसाहतीतुन ४७ किलो अंमली पदार्थ जप्त

महाराष्ट्रातल्या महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून ४७ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून २२ मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली. हे दोघे सध्या जामीनावर बाहेर असल्याचंही पथकानं सांगितलं आहे. 

October 7, 2024 1:39 PM October 7, 2024 1:39 PM

views 13

भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त पथकानं मध्य प्रदेशात भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भोपाळजवळच्या बागरोडा गावातल्या एका कारखान्यातून हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे