September 7, 2024 3:51 PM September 7, 2024 3:51 PM

views 10

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ जणांना भिवंडी पोलिसांनी केली अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक  आहे. त्यांच्याकडून साडे ५००किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या टोळीनं टेम्पोला बनावट क्रमांक ओडिशातून हा गांजा आणला होता.

June 29, 2024 10:24 AM June 29, 2024 10:24 AM

views 11

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.