November 8, 2025 3:12 PM November 8, 2025 3:12 PM

views 25

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलीसांनी केली अटक

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेन्टर माईन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता ही इंजेक्शन तो जीममध्ये जाणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणांना विकत असल्याचं उघड झालं.

June 22, 2025 7:55 PM June 22, 2025 7:55 PM

views 12

CSMI विमानतळावर २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. थायलंडमधून तस्करी करून आणलेल्या या गांजाची बेकायदेशीर बाजारपेठेत अंदाजे २४ कोटी ६६ लाख  रुपये किंमत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. 

August 23, 2024 3:15 PM August 23, 2024 3:15 PM

views 19

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर बंदी

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. यात प्रतिजैविकं, वेदनाशामक आणि जीवनसत्वांच्या औषधांचा समावेश आहे. बंदी घातलेल्या १५६ औषधांमध्ये काही अनुचित मिश्रण असल्याचं निदर्शनास आलं असून  यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.   सरकार आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळ-DTAB यांच्या विशेष समितीनं केलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेतल्याचंही अधिसूचनेत म्हटलं आहे. या समितीनं केलेल्या तपासात ही औषधे रुग्णासा...