October 29, 2025 12:58 PM October 29, 2025 12:58 PM

views 36

राफेल लढाऊ विमानातून राष्ट्रपतींचं उड्डाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं. अंबाला इथल्या हवाईदल तळावरुन त्यांनी राफेलमधून आकाशात झेप घेतली. . याआधी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधल्या तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं.

June 27, 2025 3:54 PM June 27, 2025 3:54 PM

views 13

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. MSME क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं. MSME क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं ...

August 6, 2024 3:42 PM August 6, 2024 3:42 PM

views 20

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत-फीजी संबध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासमवेत चर्चा केली. फिजीची राजधानी सुवा इथं आज सकाळी त्यांनी भ...

August 3, 2024 10:02 AM August 3, 2024 10:02 AM

views 12

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या 3 देशांना भेट देणार

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांना भेट देणार आहेत. फिजी आणि पूर्व तिमोर या देशांना भारतीय राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं भारताचे पूर्वेकडील देशांचे परराष्ट्र सचिव जयदीप मुझुमदार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'अॅक्ट ईस्ट' अर्थात पूर्वेकडील देशांकडं विशेष लक्ष देण्याच्या धोरणाचा भाग आहे असंही मुझुमदार म्हणाले.

July 6, 2024 1:04 PM July 6, 2024 1:04 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ४ दिवस ओदिशा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत. त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र, सुभद्रा देवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथ यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमणी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.   सोमवारी त्या ऐतिहासिक उदयगिरी आणि खंडगिरी गुंफांना भेट देऊन नंतर बिभूती कानूंगो महाविद्यालय आणि उत्कल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी दिल्लीला परतण्यापूर्वी ...