November 6, 2024 3:27 PM November 6, 2024 3:27 PM

views 8

धुळ्यात ८ नोव्हेंबरला विनापरवाना ड्रोन उडवण्यास प्रतिबंध

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा धुळ्यात येत आहेत. धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांझरापोळ गोशाळा इथं प्रधानमंत्री येणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परवा म्हणजे ८ नोव्हेंबरला या भागात विनापरवाना ड्रोन उडवण्यास प्रतिबंध घालणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.