February 14, 2025 8:27 PM February 14, 2025 8:27 PM

views 14

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ इराणी नागरिकांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन इराणी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ किलो १४३ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास ६ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. हे तिन्ही प्रवासी दुबईहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

January 4, 2025 3:53 PM January 4, 2025 3:53 PM

views 18

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार जणांना अटक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या ड्युटी फ्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केली आहे. तस्करीचं सोनं विमानतळाबाहेर पोहोचवण्याचं काम ते करत असत. त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ८४ लाख रुपये किमतीची ६ किलो सोन्याची भुकटीही जप्त करण्यात आली.