August 12, 2024 3:46 PM August 12, 2024 3:46 PM
12
नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा, ५२ किलो मेफेड्रोन जप्त
महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचं ५२ किलो मेफेड्रोन जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणं देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.