December 31, 2024 3:27 PM December 31, 2024 3:27 PM

views 6

डीआरडीओच्या सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या दोन करारांवर स्वाक्षरी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या एआयपी प्रणालीच्या एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन प्लगची उभारणी आणि त्याचं भारतीय पाणबुड्यांचं एकीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉर्पेडोच्या कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी एकत्रीकरणासंबंधीच्या सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या दोन करारांवर काल संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं दोन्ही करार करण्यात आले. त्यामध्ये एआयपी प्लगचं बांधकाम आणि त्याच्या एकत्रीकरणासाठी मुंबईच्या माझग...

August 14, 2024 1:32 PM August 14, 2024 1:32 PM

views 10

‘गौरव’ या लांब पल्ल्याच्या क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी

लांब पल्ल्याची क्षमता असलेल्या, गौरव या स्वदेशी बनावटीच्या बॉम्बची काल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं अर्थात डीआरडीओ नं यशस्वी चाचणी घेतली. ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई विमानातून या बॉम्बची चाचणी घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. डीआरडीओ च्या हैदराबादमधल्या संशोधन केंद्रात विकसित केलेल्या गौरव या बॉम्बनं एका बेटावर निर्माण केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ सह हवाई दल आणि उद्योग क्षेत्राचं कौतुक केलं.