January 2, 2025 8:19 PM January 2, 2025 8:19 PM

views 4

‘डीआरडीओनं संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात’

डीआरडीओ, अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आपल्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं डीआरडीओ च्या ६७ व्या स्थापना दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रयत्नांमुळे विचारांच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल आणि भारतीय संरक्षण क्षेत्राला नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्याची संधी मिळेल, असं ते यावेळी म्हणाले.