July 12, 2025 1:04 PM July 12, 2025 1:04 PM
10
‘अस्त्र’ या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
अस्त्र या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलानं घेतली. ओडिशातल्या परीक्षण स्थळावरून या हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वेगवेगळ्या पल्ल्यांच्या आणि उच्चगती मानवरहित हवाई लक्ष्यांवर प्रक्षेपण करण्यात आलं, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.