December 28, 2025 4:52 PM December 28, 2025 4:52 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदलतळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आएनएस वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला असून अठरा किलोमीटर परिसरात मासेमारी बंद करण्यात आली आहे.

December 21, 2025 10:03 AM December 21, 2025 10:03 AM

views 5

करुणा, सुसंवाद, परस्पर आदर ही मूल्ये बळकट, सुसंवादी आधुनिक जगाचा पाया असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

करुणा, सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारी ही मूल्य भूतकाळातील नसून, बळकट आणि सुसंवादी आधुनिक जगासाठी आवश्यक असलेला पाया आहेत. असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. तेलंगणातील हैदराबाद इथं गाचीबोवली इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या दृष्टीकोनासाठी आधुनिक शिक्षण आणि नैतिक शहाणीव तसंच नवोपक्रम आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम असणे आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या. देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या कौशल्यांनी आणि ज्ञानाने नव्हे तर सचोटी आणि उद्देशाप्र...

December 14, 2025 8:08 PM December 14, 2025 8:08 PM

views 38

ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत...

December 12, 2025 10:43 AM December 12, 2025 10:43 AM

views 14

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते इम्फाळमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संध्याकाळी इम्फाळमधील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या समारंभात 1 हजार 3 शे 87 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. राष्ट्रपती कालपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.   याप्रसंगी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की उद्घाटन झालेल्या या प्रकल्पांमुळं रोजगार निर्माण होईल, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि आर्थिक उपक्रमांना गती मिळेल. मणिपूरच्या समावेशक विकासासाठी आणि राज्यातील लोकांच्या सक्षमीकरणाकरि...

December 9, 2025 3:02 PM December 9, 2025 3:02 PM

views 18

नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हस्तकला पुरस्काराचं वितरण

वर्ष २०२३ आणि २०२४ साठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी यांनी आज नवी दिल्लीत वितरित केले. विविध हस्तकला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकंदर ४८ जणांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. या क्षेत्रामुळे विशेषतः ग्रामीण भागात ३२ लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होत असल्याची बाब राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली.

November 8, 2025 1:27 PM November 8, 2025 1:27 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत.   त्यानंतर 11 नोव्हेंबरला त्या बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील.  

November 7, 2025 2:24 PM November 7, 2025 2:24 PM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा वंदे मातरम् गीताला अभिवादन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हे गीत आजही सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सर्व नागरिकांनी भारतमातेच्या समृद्धीसाठी काम करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी के...

October 18, 2025 9:24 AM October 18, 2025 9:24 AM

views 78

आदि कर्मयोगी अभियानात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार

देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या 'आदि कर्मयोगी अभियान' या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदाय, राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवासात सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 'धरती आबा जनभागीदारी अभियाना'त सर्वोत्कृष्ट राज्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला अस...

September 8, 2025 3:45 PM September 8, 2025 3:45 PM

views 12

भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची, तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    देशाच्या विकासात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था अस्थिर झाली तरी त्याचा देशाच्या अर्थव्यवस...

August 29, 2025 1:09 PM August 29, 2025 1:09 PM

views 9

स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठीचे स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनाचं एक शक्तिशाली साधन ठरले आहेत, असं राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना म्हणाल्या.   सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक उन्नती आणि संतुलित प्रादेशिक विकासाचा पाया घातल्याचंही मुर्मू यावेळी म्हणाल्या.