February 20, 2025 12:59 PM February 20, 2025 12:59 PM

views 20

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही राज्ये सांस्कृतिक वारश्यानं समृद्ध असून तिथले नागरिक या अद्वितीय नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारश्याचं अभिमानानं जतन करतील, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही राज्यातले लोक प्रगतीचा आणि उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहितील, असंही राष्ट्रपती म्हणाल्या.      केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अरुणाचल आणि मिझोरम मधल्या नागरिकांना राज्य स्थापन...

February 15, 2025 5:06 PM February 15, 2025 5:06 PM

views 4

पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपतींचं उद्योजकांना आवाहन

नवउद्योजक आणि व्यावसायिकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.   त्या आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्यात झालेल्या अनोख्या बदलांमुळे भविष्यात नाट्यमय परिवर्तन अनुभवायला मिळेल असं त्या म्हणाल्या.   विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा उत्साह आणि वचनबद्धता महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्...

January 18, 2025 1:22 PM January 18, 2025 1:22 PM

views 23

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.   यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्...

January 17, 2025 1:26 PM January 17, 2025 1:26 PM

views 8

राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेल पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, आणि नेमबाज मनु भाकर या चौघांना प्रदान करण्यात आला. ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं .   क्रीडाप्रशिक्षकांना देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्...

January 9, 2025 2:31 PM January 9, 2025 2:31 PM

views 9

राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर

या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींचं आज भुवनेश्वरमध्ये आगमन होणार आहे. राष्ट्रपती उद्या परिषदेत प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज मेघालयमध्ये उमियममध्ये आयसीएआर संशोधन संकुलाच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

January 9, 2025 1:16 PM January 9, 2025 1:16 PM

views 14

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.   चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति प्रधानमंत्री मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत ...

November 8, 2024 2:33 PM November 8, 2024 2:33 PM

views 11

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे- राष्ट्रपती

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताह २०२४ निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.   डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, ई मार्केटप्लेस आणि इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट यासारखी अनेक पावलं भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं उचलली असल्याचं त्या म्हणाल्या. तक्रारींचा जलद निपटारा व्हावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याचं केंद्रीय दक्षता आयुक्तांनी यावेळी सांगित...

November 7, 2024 10:34 AM November 7, 2024 10:34 AM

views 10

छटपूजेनिमित्त द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छटपूजेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. छटपूजा हा देशातल्या सर्वांत प्राचीन सणांपैकी एक असून, सूर्याचं पूजन करण्याची ती संधी आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.   हा सण नद्या आणि तलावांबाबत कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपवासाच्या माध्यमातून मन आणि आत्मा शुद्ध करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. हा सण पर्यावरणाचं रक्षण करण्याचीही प्रेरणा देतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

September 28, 2024 1:07 PM September 28, 2024 1:07 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या हैद्राबाद इथल्या नालसार विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिंकदराबाद इथल्या राष्ट्रपती निलायम मधील भारतीय कलामहोत्सवाचं उद्घाटन करण्यात येईल. आठ दिवस चालणाऱ्या या कलामहोत्सवात ईशान्येकडच्या राज्यातल्या कला, हस्तकला आणि पाककला सादर केल्या जाणार आहेत. या महोत्सवात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरातले कलाकार सहभागी होणार आह...

September 21, 2024 12:22 PM September 21, 2024 12:22 PM

views 48

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात, देशाच्या विकासात ही खरी भागीदारी होऊ शकते असंही मुर्मू म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींच्या आधारे त्यांच्या भविष्यातील कार...