June 23, 2024 3:14 PM

views 16

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या मदुद्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतल्या परस्पर भागीदारीविषयी आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.