December 31, 2024 3:20 PM

views 19

हिंद-प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध

हिंद-प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्वाड एक महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद-प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. क्वाड देश आता हिंद-प्रशांत प्रदेशाच्या सीमेपलिकडे जाऊन प्रश्नांची सोडवण्याचं काम करत आहेत, असं क्वाडच्या विसाव्य...

December 27, 2024 3:59 PM

views 14

भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर आणि सध्याच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा केली. डॉ. जयशंकर २४ डिसेंबरपासून सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. प्रमुख द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतील. या भेटीदरम्यान ते अमेरिकेतल्या भारताच्या महावाणिज्य...

December 14, 2024 2:31 PM

views 20

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज-डॉ. एस. जयशंकर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या 15 व्या भारत-UAE संयुक्त आयोगाच्या बैठकीत डॉ. जयशंकर बोलत होते. एकात्मिक आर्थिक भागीदारीमुळे दोनही देशांचा व्यापार 85 बिलीअन डॉलर्सवर गेला आहे. दोनही देशांदरम्यानचं स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी जपणं हे दोनही देशांच्या समृध्...

December 1, 2024 12:30 PM

views 13

अमेरिकेत नुकारापु साई तेजा या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याबद्दल डॉ. एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलं

अमेरिकेत नुकारापु साई तेजा या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शिकागोमधील भारतीय दूतावासाद्वारे सर्व शक्यती मदत केली जात असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. या विद्यार्थ्याचा खून करणाऱ्या लोकांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी शिकागोमधील भारतीय दूतावासानं केली आहे.  

September 11, 2024 2:24 PM

views 19

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्यात बर्लिनमध्ये विविध मुद्यांवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. पश्चिम आशियातील परिस्थिती, विशेषत: गाझा संघर्ष आणि त्याचे परिणाम यासह व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर लक्ष केंद्रित करून भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यात आल्याचं जयशंकर यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच बर्लिनमधील परराष्ट्र कार्यालयाच्या वार्षिक राजदू...

September 8, 2024 7:58 PM

views 12

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले. या भेटीत ते रियाध इथं होत असलेल्या पहिल्या भारत-आखात सहकार्य संघटनेच्या - जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम आशियातले ६ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याशिवाय या दोन दिवसांच्या भेटीत ते जीसीसीच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठका घेण्याचीही शक्यता आहे.   येत्या मंगळवारी ते आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प...

August 27, 2024 12:33 PM

views 21

नवी दिल्लीत आज ९ व्या भारत-ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन

भारत आणि ब्राझील यांच्यात आज होणाऱ्या ९व्या संयुक्त आयोग बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो वीईरा संयुक्तपणे भुषवतील. मौरो वीईरा हे चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझीलमधल्या राजनैतिक संबंधांना चालना मिळेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.  ब्राझील यावर्षी होणाऱ्या जी २० परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. ब्राझीलच्या या अध्यक्षपदाच्या काळात तीन गटांच्या समूहात भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा स...

August 19, 2024 10:43 AM

views 30

भारत आणि कुवेत यांच्यातील भागीदारी सातत्याने वाढ- परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी काल कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालेद अल-सबाह अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांची काल भेट घेतली. भारत आणि कुवेत यांच्यात सद्भावना आणि मैत्रीचे अनेक शतकांपासूनचे संबंध असून दोन्ही देशांमधील भागीदारीत सातत्याने वाढ होत आहे, असं डॉक्टर जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. उभय देशांदरम्यानचे हे संबंध आणखी वरच्या पातळीवर नेण्यासाठी युवराजांनी मार्गदर्शन करून सल्ला दिल्याबद्दल जयशंकर यांनी आपल्या संदेशात त्यांचे आभारही मानले आहेत. जयशंकर यांनी कुवेत...

July 24, 2024 2:54 PM

views 22

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं भारतात आगमन

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं आज भारतात आगमन झालं. मंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच औपचारिक दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लॅमी यांचं स्वागत केलं. या दौऱ्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होईल, असा विश्वास जयस्वाल यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.

July 16, 2024 1:42 PM

views 19

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. भारत आणि मॉरिशस या देशांच्या परस्पर संबधांत वाढ व्हावी यासाठी हा दौरा असल्याचं डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात डॉ. जयशंकर मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांची भेट घेणार असून मॉरिशसच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.