November 18, 2025 7:32 PM November 18, 2025 7:32 PM
7
कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं-एस जयशंकर
कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं असं आग्रही प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. ते रशियात मास्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलत होते. सध्या हवामान बदल, महामारी आणि अतिरेक यांच स्वरुप अधिकाधिक टोकाला जात आहे आणि त्यासाठी माणसामाणसांमधील सहकार्य आवश्यक आहे असंही ते म्हणाले.