December 14, 2025 8:03 PM December 14, 2025 8:03 PM

views 23

आयआयटी बॉम्बे इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण

आयआयटी बॉम्बे  अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज  लोकार्पण करण्यात आलं.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं  रामदास आठवले यांनी  यावेळी सांगितलं.

October 16, 2025 3:08 PM October 16, 2025 3:08 PM

views 46

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार

खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलं असात  महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत फारसा फायदा होणार नाही असं आठवले म्हणाले.   मुंबईत ४० टक्के मराठी मतदारांचा कौल हा महायुतीलाही मिळणार असून २० टक्के मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त ...

November 6, 2024 7:54 PM November 6, 2024 7:54 PM

views 13

माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन मतदारसंघांमधल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात शिवसेनेचेच सुरेश पाटील उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

September 17, 2024 6:12 PM September 17, 2024 6:12 PM

views 12

दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, त्यांचं आरक्षण आहे तसचं राहील, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात डहाणू इथं दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत दिव्यांगांना मोफत सहायक उपकरणांचं वाटप यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं.  वाढवण बंदरा विषयी आठवले म्हणाले, की देशातलं हे मोठ बंदर असून देशाच्या आर्थिक विकासात त्याचा ...

September 10, 2024 6:29 PM September 10, 2024 6:29 PM

views 19

विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा – पक्षाध्यक्ष रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.   लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी विधानसभेला आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचा फायदा महायुतीला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइनं १२ जागांची मागणी केली आहे. रिपाइंमुळे महायुतीतल्या तीनही प्रमुख पक...