November 16, 2024 5:51 PM November 16, 2024 5:51 PM

views 16

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्षाहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी केली असून त्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. पन्नास हजार रुपये रोख, मानपत्र,आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या  मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार हा प्रदान केला जाणार आहे.