August 24, 2024 5:39 PM

views 22

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं आवाहन

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं आहे भारताला सुदृढ राष्ट्र बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाचा पुनरुच्चार मांडवीय यांनी यावेळी केला. प्रधानमंत्र्यांच्या फिट इंडिया चळवळीचं महत्व अधोरेखित करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन सक्रिय राहणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन केवळ आपल्या क्रीडापटूंचा गौरव करण्याची एक संधी नसून संतुलित आणि नि...

July 19, 2024 8:33 PM

views 17

भारताला २०२७पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्राची महत्त्वाची भूमिका – क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय

भारताला २०२७ पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं मांडवीय यांनी आज भारताचे ऑलिम्पिकपटू आणि पॅरालिम्पिकपटूंशी संवाद साधला. देशाच्या क्रीडापटूंना योग्य मदत आणि संधी मिळाल्या, तरच भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या वाढले आणि सरकार या दिशेने सरकार पावलं उचलत आहे, असंही त्यांनी सांगितलं. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीवर प्रकाश टाकणाऱ्या पाथवे टू पॅरिस या पुस्तिकेचं प्रकाशन...