December 8, 2025 1:35 PM

views 14

 माय भारत पोर्टलवर दोन कोटींहून अधिक तरुणांची नोंदणी

माय भारत पोर्टलवर दोन कोटींहून अधिक तरुणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मांडवीय म्हणाले की, भारतातल्या तरुणांना राष्ट्र उभारणीत सक्षम करण्यासाठी आणि सहभागी करून घेण्यासाठी निर्माण केलेलं माय भारत हे एकछत्री व्यासपीठ आहे.   एनसीसी, एनएसएस आणि स्काउट गाईड या व्यासपीठाखाली काम करत आहेत. राष्ट्रीय युवा कॉर्प्स योजनेअंतर्गत १३ हजार २०० पेक्षा जास्त तरुणांची भरती केली जा...

September 8, 2025 2:48 PM

views 10

डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार

तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला. रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं.   खासगी क्षेत्राशी भागीदारी केल्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतीलच, शिवाय कृषी, सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांची प्रगती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असा वि...

April 2, 2025 1:20 PM

views 22

देशातल्या युवकांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करावं- मनसुख मांडवीय

देशातल्या युवकांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करावं असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा संसदेत बोलत होते.   भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विकसित भारत या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय युवा संसदेत देशभरातल्या ३०० जिल्ह्यातले युवक सहभागी झाले आहेत. युवा संसदेतून  युवकांना देशाच्या लोकशाहीचं स्वरूप समजून घेता येईल, असं मांडवीय यांनी सांगितलं. 

January 20, 2025 7:17 PM

views 16

कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याला सरकारचं प्राधान्य-डॉ. मनसुख मांडविय

देशात ७० ते ८० लाख असंघटित कामगार असून कोणताही भेदभाव न करता कामगारांना सामाजिक सुरक्षा देणं याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज सांगितलं. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना संघटित बनवणं आणि त्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळवून देणं या विषयावरच्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  सरकारच्या आरोग्यसेवा योजनांचे अंदाजे ६० कोटी लाभार्थी असून त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळाल्याची माहिती मांडविय...

January 7, 2025 8:13 PM

views 18

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताची तयारी सुरु

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, असं केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या १५२व्या मिशन ऑलिम्पिक सेल बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ताज्या दमाच्या होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले.

January 7, 2025 7:16 PM

views 19

ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी-डॉ. मनसुख मांडवीय

ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी होत असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं ई-श्रम पोर्टलच्या बहुभाषिक सुविधेचं उदघाटन करताना बोलत होते. पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे सामाजिक सुरक्षा योजना आणि उपक्रमांच्या विस्तृत श्रेणीमध्ये  प्रवेश सुलभ होईल, असं ते यावेळी म्हणाले. सर्व असंघटित कामगारांनी  त्यांच्या कल्याणासाठी, उपजीविकेसाठी आणि कल्याणासाठी तयार केलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदण...

December 27, 2024 3:15 PM

views 8

सक्तवसुली अधिकारी नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रदान

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्तवसुली अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं दिली. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून डॉ. मांडविय यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या सचोटी, समर्पण आणि वचनबद्धता या मूल्यांचे पालन करण्याचं आवाहन केलं. कामगारांसाठी न्याय्य आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्...

December 2, 2024 7:26 PM

views 12

२०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू

भारतीय ऑलिपिंक संघटनेनं २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू केली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या संबंधीचं पत्र जारी केलं आहे, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. 

October 20, 2024 8:29 PM

views 11

खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा  सहभाग वाढला-मनसुख मांडवीय

खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा  सहभाग वाढला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काढले. तिरुअनंतपुरम इथं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रा अंतर्गत एका महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. पदक जिंकल्यानं फक्त त्या खेळाडू आणि त्याच्या प्रियजनांचाच सन्मान होत नसून संपूर्ण देशाचा सन्मान होतो असं ते म्हणाले. २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पदकतालिकेत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवण्याचं भारताचं ...

September 1, 2024 6:56 PM

views 15

हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील – मंत्री डॉ. मनसुख मांडविय

हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार विविध मार्गांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या कामगारांना योग्य ती सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कामगारांची नोंदणी ही ई-श्रम पोर्टलद्वारे केली जाणार आहे. हंगामी आणि प्लॅटफाॅर्म कामगारांना नियुक्त करणाऱ्यांना कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची नोंदणी करावी असं सांगितलं जाईल यावर म...