August 2, 2024 2:14 PM August 2, 2024 2:14 PM

views 11

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे – डॉ. एल. मुरुगन

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. या संदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत २०१९ मध्ये सुरु केलेल्या तथ्य तपासणी विभागानं आतापर्यंत ९ हजार ९२२ संदेश बनावट बातम्या म्हणून उघड केले आहेत. असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही बातम्यांची शहानिशा करू...