November 1, 2025 12:05 PM November 1, 2025 12:05 PM

views 30

भारत-इंग्लंड संबंध आता गतिमान आणि भागीदारीमध्ये विकसित झाले – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

भारत-इंग्लंड संबंध एका गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संबंधापासून गतिमान आणि भविष्यकालीन भागीदारीमध्ये विकसित झाले असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीमध्ये यूके राष्ट्रीय दिन समारंभात ते बोलत होते.   दोन्ही देश कनेक्टिव्हिटी, एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या बाबतीतही एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करतअसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

August 18, 2024 11:17 AM August 18, 2024 11:17 AM

views 10

संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री, डॉ. एस जयशंकर यांचा पुनरुच्चार

तिसऱ्या ग्लोबल साऊथ परिषदेत, अन्न, आरोग्य, उर्जा सुरक्षा यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीचा काल समारोप झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल्याचं सांगून सदस्यांमध्ये तशी भावना वाढत असल्याचं सांगितलं. या बैठकीत इतरही विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये संसाधनांविषयीची आव्हाने, संसाधनांपर्यंत पोचणे आणि रोजगार आणि आर्थिक असमानता या समस्यांचा समावे...

July 18, 2024 3:40 PM July 18, 2024 3:40 PM

views 11

मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले उद्घाटन

भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी काल मॉरिशस इथं केलं. यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनॉथ उपस्थित होते. भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यानच्या आरोग्य भागीदारी उपक्रमा अंतर्गत भारतात उत्पादन झालेल्या आणि स्वस्त औषधांचा पुरवठा मॉरिशस मध्ये केला जाईल, अशी ग्वाही जयशंकर यांनी यावेळी केली. त्याआधी जयशंकर यांनी मॉरिशसच्या ग्रँड बोआ परिसरात भारताच्या आर्थिक मदतीच्या आधारे उभ्या केलेल्या मेडिक्लिनिक उपक्रमाचं उद्घाटन केलं.  

July 16, 2024 7:44 PM July 16, 2024 7:44 PM

views 13

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज पोर्ट लुईस येथे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. जयशंकर यांनी भारत-मॉरिशस विशेष आणि कायमस्वरुपी भागीदारी बद्दल चर्चा केली आणि त्याच्या अधिक विस्ताराचं कौतुक केलं. अंतराळ सहकार्य, राष्ट्रीय अभ्यासक्रम संशोधन संस्थेचा विकास, आदी क्षेत्रात झालेल्या करारांचा त्यांनी आढावा घेतला. मॉरिशियस मध्ये राहणाऱ्या सातव्या पिढीतल्या नागरिकांना जयशंकर यांनी परदेशी भारतीय नागरिकत्त्वाच्या कार्डचं वाटप केलं.