September 19, 2025 7:55 PM September 19, 2025 7:55 PM
23
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचं निधन
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण, तसंच इतिहास, प्राच्यविद्या इत्यादी विषयांवर त्यांनी तीसपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली.