December 6, 2025 8:21 PM December 6, 2025 8:21 PM

views 87

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.  बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व न्याय, समता आणि संविधानाच्या तत्वांवरची त्यांची निष्ठा भारताच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली आहे, ...

November 30, 2025 7:09 PM November 30, 2025 7:09 PM

views 27

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा गौरव केला. बाबासाहेबांच्या मूल्यांच्या प्रसारासाठी आपण दौरा करणार असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.

November 27, 2025 1:16 PM November 27, 2025 1:16 PM

views 54

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण

पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संकल्पनांनी अगणित लोकांच्या जीवनात शक्ती आणि आशा निर्माण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

April 12, 2025 5:14 PM April 12, 2025 5:14 PM

views 6

येत्या १४ आणि १५ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयानं येत्या १४ आणि १५ एप्रिलला मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन केलं आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली. या टूर सर्कीटमध्ये मुंबईतल्या  दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ मधील बि.आय.टी चाळ, वडाळा इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट मधील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. नाशिकमधील य...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम दर्जेदार करावं – मंत्री संजय शिरसाट

मुंबईत दादर इथल्या इंदू मिलमधे उभारल्या जात असलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण एप्रिल 2026 पर्यंत करण्याचा मानस असून स्मारकाचं काम दर्जेदार करावं, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.   मुंबईत वरळी इथं सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या तीन वसतिगृहांना शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या सोयी- सुविधांमध्ये सुधारणा करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पध्...

December 6, 2024 7:00 PM December 6, 2024 7:00 PM

views 17

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.    नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्री निवासात  महारक्तदान शिबिराचं  आयोजन करण्यात आलं होतं.    हिंगोली जिल्ह्यातही  विविध ठिकाणी अभिवादन सभा तसंच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाशिम शहरातल्या  विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटे कॅण्डल रॅली...

December 6, 2024 6:56 PM December 6, 2024 6:56 PM

views 418

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केलं. समता आणि माणसांच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी...