November 30, 2025 10:50 AM

views 44

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं – डॉ. अजय कुमार

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं.  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा, सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल  असंही त्यांनी अधोरेखित केलं. या तुकडीचं दीक्षांत संचलन आज सकाळी एनडीए च्या मैदानावर  सुरू असून नौदल प्रमुख ऍडमिरल दिन...