December 8, 2025 8:21 PM December 8, 2025 8:21 PM

views 9

दूरदर्शनच्या ‘सुप्रभातम’ कार्यक्रमाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘सुप्रभातम’ या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. योगापासून भारतीय जीवनशैलीपर्यंत विविध पैलूवर चर्चा घडवून आणणारा हा कार्यक्रम रोजची सकाळ तजेलदार बनवतो, असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ‘सुप्रभातम’ हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ वाजता डी डी न्यूज या वाहिनीवरून प्रसारित केला जातो. 

February 11, 2025 9:03 PM February 11, 2025 9:03 PM

views 9

प्रसारभारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा

प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज मुंबईत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना दिल्या. मे महिन्यात १ ते ४ तारखेदरम्यान होणाऱ्या waves परिषदेच्या तयारीचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.    

September 15, 2024 8:16 PM September 15, 2024 8:16 PM

views 16

दूरदर्शनची ६५ वी गौरवरशाली वर्षपूर्ती

देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेलं दूरदर्शन आज आपली ६५  गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. १५  सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं. १९७५  पर्यंत दूरदर्शन आकाशवाणीचाच घटक होता. १ एप्रिल १९७६  रोजी, त्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रूपांतर झालं आणि  ते प्रसार भारती अंतर्गत आलं. सरकारचं स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक ...

August 2, 2024 6:57 PM August 2, 2024 6:57 PM

views 22

सह्याद्री वाहिनीवर नव्या तीन कार्यक्रमांची घोषणा

दर्जेदार आणि अभिरुची संपन्न आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या दूरदर्शन वाहिनीनं चार नवीन कार्यक्रमांची मेजवानी आणली आहे. यातले तीन कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहेत.   या कार्यक्रमांत आमची अनन्या ही कौटुंबिक मालिका, आमचे हे आमची ही हा सेलिब्रिटी जोडप्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि वाचू आनंदे हा नामवंत साहित्यिकांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमांविषयी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी वार्ताहर परिषदेत सविस्तर माहिती ...