November 16, 2025 2:43 PM November 16, 2025 2:43 PM

views 19

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी केले आहेत. भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ होणार आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातून येणारी फळं आणि फळांचे रस, चहा आणि मसाले यांच्यावर परस्पर शुल्काचा परिणाम होणार नाही. व्हाईट हाऊसनं नमूद केलेल्या इतर वस्तूंमध्ये कॉफी आणि चहा, कोको, संत्री, टोमॅटो यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी भारतातून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क लादलं होतं आणि रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त...

May 10, 2025 1:49 PM May 10, 2025 1:49 PM

views 6

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याचं उल्लंघन केलं तर नव्या निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन्ही देशांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं स्वागत केलं आहे. रशिया चर्चेसाठी तयार आहे, असं पेस्कोव्ह म्हणाले.

March 14, 2025 1:48 PM March 14, 2025 1:48 PM

views 6

ग्रीनलँड ताब्यात घेता येईल, अमेरिकेच्या अध्यक्षांना विश्वास

डेन्मार्कचा स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँडला अमेरिका अधिग्रहित करू शकेल असा आपला विश्वास असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नाटो चे महासचिव मार्क रुट यांच्याशी काल व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अमेरिका ग्रीनलँड या बेटाला अधिग्रहित करु शकेल आणि या कामी नाटोचे प्रमुख महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं ट्रम्प म्हणाले.    ग्रीनलँडमध्ये आधीपासूनच अमेरिकी सैन्य असून यापुढे तिथं अधिक अमेरिकी सैनिक असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र ग्रीनलँड...