September 12, 2025 1:23 PM September 12, 2025 1:23 PM
9
कतारची राजधानी दोहामध्ये इस्राइलनं केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून निषेध
कतारची राजधानी दोहा इथं इस्राइलनं मंगळवारी केलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेतल्या अमेरिकेसह सर्व १५ सदस्यांनी सहमतीनं हा निषेध केला. हमासच्या नेत्यावर हा हल्ला झाला होता, त्यात हमासचे ५ सदस्य ठार झाले मात्र वरिष्ठ नेता बचावला. कतारच्या सुरक्षा दलातल्या एका जवानाचाही यात मृत्यू झाला. दरम्यान, इस्राइली सैन्य दलानं वेस्ट बँकमध्ये टाकलेल्या छाप्यात काही पॅलेस्टिनी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. या भागात लष्करानं संचारबंदी लादली आहे. इस्राइली सैन...