August 21, 2024 7:45 PM August 21, 2024 7:45 PM

views 2

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं एम्सचं आवाहन

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे. एम्सनं आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधिष्ठातांचा अध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  संस्थेनं आरोग्य सेवा कर्मचारी, रुग्ण आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अंतर्गत सुरक्षा ऑडिटसाठी स्वतंत्...

August 20, 2024 6:14 PM August 20, 2024 6:14 PM

views 16

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागं घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणाचा निकाल तातडीनं लागावा या मागणीसाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता.  सरकारकडे केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागं घेत असल्याचं निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सांगितलं. अन्य ठिकाणीच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरही लवकरच संप मागं घेतील अशी अपेक्षा आहे.

August 20, 2024 9:40 AM August 20, 2024 9:40 AM

views 7

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांचा संप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेत वाढ आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. महिला आरोग्यसेवकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी काल आझाद मैदान इथं मूक मोर्चा काढला. मुंबईतल्या सायन रुग्णालयात मद्यपान केलेला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना निवासी महिला डॉक्टरशी छेडछाड केल्यानं हा संप पुकारण्यात आला असून याप्रकणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या छेडछाडीप्रकरणी रुग्णालयाकडून कठोर कारवाई होईपर्यंत हा संप...

August 17, 2024 8:27 PM August 17, 2024 8:27 PM

views 13

कोलकातामधल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे.    देशभरात विविध भागात डॉक्टर संघटनेनं संपाला प्रतिसाद दिला असून सामान्य रुग्णालयात रुग्णसेवा बंद आहेत. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.   पुण्यातल्या ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाती...

August 13, 2024 6:46 PM August 13, 2024 6:46 PM

views 11

कोलकात्यात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन

राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयांतल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. मुंबईत मार्डच्यावतीने सकाळी साडेदहा वाजल्यापासून केईएम, नायर, सायन कुपर या रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि  हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी  देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. फोर्डा या निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.  याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशी व्हावी, ही आंद...