May 28, 2025 2:37 PM May 28, 2025 2:37 PM

views 11

तामिळनाडू राज्यसभेच्या चार जागांवरच्या निवडणुकीसाठी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या उमेदवारांची घोषणा

तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या चार जागांवरच्या निवडणुकीसाठी द्रविड मुन्नेत्र कळमने चार उमेदवारांची घोषणा केली असून यात अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांचा समावेश आहे. तामिळनाडूमधल्या चार रिक्त जागांसाठी १९ जून रोजी ही निवडणूक होत आहे. द्रमुकचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात पी विल्सन, एस आर शिवलिंगम, रुकैया मलिक आणि कमल हासन यांचा समावेश आहे.