October 15, 2025 3:04 PM October 15, 2025 3:04 PM
84
१८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी
दिल्ली-एनसीआर परिसरात येत्या १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पर्यावरणपूरक हरित फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. फटाके फोडण्यासाठी सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते १० या दरम्यानच वेळ देण्यात आली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी झाली. या कालावधीत हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेचं निरीक्षण करण्याचे आणि १४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान फटाक्यांमुळे दिल्लीच्या हवेवर होणाऱ्या परिणामांचा अहवाल सादर क...