October 8, 2025 7:33 PM October 8, 2025 7:33 PM
103
पुणे महापालिकेचा दिवळी बोनस जाहीर!
पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसंच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त ८ पूर्णांक ३३ शतांश टक्के बोनस जाहीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनाबरोबर बोनस दिला जाणार आहे. विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे.