October 22, 2025 7:58 PM October 22, 2025 7:58 PM
17
Diwali 2025: बलिप्रतिपदेचा सण सर्वत्र साजरा
दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. विक्रम संवत २०८२ पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही आज झाला. गुजराती नागरिकांचं नव वर्षही आजपासून सुरू झालं. पती-पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट, फराळ आणि खरेदीची लगबग दिसत आहे. अनेक ठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांचं आयोजन झाल्यानं अनेक जण उत्साहात त्यात सहभागी झाले होते. नवीन वाहनं, कपडे, भेटव...