December 10, 2025 1:36 PM December 10, 2025 1:36 PM

views 109

नेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश

भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.   ही बातमी समजल्यावर देशात आणि जगभरातल्या भारतीय समुदायात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दीपावली हा केवळ सण नाही तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज...

October 29, 2025 3:37 PM October 29, 2025 3:37 PM

views 42

दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाला ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न

राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा ते ३७ कोटी रुपयांनी जास्त आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळालं असून यंदाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाला मिळालं असून त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक विभागाचा क्रमांक लागतो.

October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 38

दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तिरावर आज २६ लाखापेक्षा जास्त दीप उजळणार

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या  ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक  प्रतिमा  जागतिक व्यासपीठावर उजळून निघेल. आज संध्याकाळी  स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालेल.   दरम्यान, काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या...

October 19, 2025 2:57 PM October 19, 2025 2:57 PM

views 43

दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय रेल्वेची उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्यांची सुविधा

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्या चालवत आहे. चेन्नईमधून १८ लाखापेक्षा जास्त प्रवासी उत्तरप्रदेश आणि बिहारला जात आहेत, त्यामुळे तामिळनाडू परिवहन विभागानं वीस हजारापेक्षा जास्त बसगाड्याही सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतल्या रेल्वेस्थानकांची पाहणी केली. तिकीट खिडकी आणि शौचालयांची सुविधा केल्यामुळे एकावेळी ७५ हजार प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करणं शक्य झाल्याचं वैष्णव म्...

October 19, 2025 9:47 AM October 19, 2025 9:47 AM

views 34

अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा

दिल्लीत काल अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून ती एक नवी पहाट असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम दर्शवणारी एक नवकथा निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी जवळपास दीड लाखांहून अधिक दिवे उजळण्यात आले तर हजारो ड्रोनच्या माध्यमातून रामायण कथा साकारण्यात आल्या. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आज शरयूतीरी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. 26 लाख 11 हजार आणि 101 दिवे उज...

October 19, 2025 8:53 AM October 19, 2025 8:53 AM

views 48

देशभरात धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा

राज्यासह देशभरात काल धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना काल शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सर्वांच्या  आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काल जनतेला शुभेच्छा दिल्या.  राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसंच नागरिकांना स्वदेशी उत्पादनं वापरण्याचं आवाहन केलं. पर्यावरण रक्षण, ...

October 18, 2025 3:23 PM October 18, 2025 3:23 PM

views 46

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं तसंच मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात, याबाबत शिक्षकांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.

October 16, 2025 7:10 PM October 16, 2025 7:10 PM

views 68

राज्यातल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर

बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांच्या, तसंच या महापालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानुसार बृहन्मुंबई  महानगरपालिकेचे कर्मचारी, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  ३१ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. तर आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार, आणि बालवाडी शिक्षिका-मदतनीस यांना ५ हजार भाऊबीज दिली जाईल.    नवी मुंबई महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपय...

October 26, 2024 10:39 AM October 26, 2024 10:39 AM

views 33

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर,उत्तर रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत विशेष गाड्यांच्या 195 अतिरिक्त फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या प्रामुख्याने नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांवरून पूर्वेकडील प्रदेशांसाठी रवाना होतील.   उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या वर्षी एक लाख सत्तर हजारांहून अधिक अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत. या विशेष ...

October 24, 2024 8:02 PM October 24, 2024 8:02 PM

views 47

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त ७ हजार विशेष रेल्वेगाड्या

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे ७ हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.