November 30, 2025 3:09 PM November 30, 2025 3:09 PM

views 4

दितवा चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता

दितवा चक्रीवादळ आता उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात  विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.   वादळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, तटरक्षक दल आणि संब...