February 8, 2025 2:46 PM February 8, 2025 2:46 PM
11
कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे. या वर्षभरात ही पाहणी होणार असून निवडक कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक खर्चाबाबत माहिती संकलित करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश, शासकीय आणि खासगी दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधा इत्यादीची माहिती गोळा करणं हा आहे. नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकड...