October 29, 2024 8:08 PM October 29, 2024 8:08 PM

views 19

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीनं एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, इंग्लंडच्या सोफी हीला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दीप्तीची ही कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही दीप्तीनं पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.