October 30, 2025 3:55 PM October 30, 2025 3:55 PM

views 20

न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळाचं ‘डिजिटायजेशन’

डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळाचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे, असं संसदीय  कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत तिसऱ्या राष्ट्रीय ई विधान परिषदेला संबोधित करत होते. कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिकेेने डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढली आहे, असं रिजिजू म्हणाले. या परिषदेत सर्व राज्यांच्या विधिमंडळांचे सचिव, नोडल विभागाचे सचिव यांच्यासह शंभर प्रतिनिधी उपस्थित होते.

July 1, 2025 8:38 PM July 1, 2025 8:38 PM

views 6

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्स मध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं.   शहरी भागापासून ते गलवान, सियाचीन आणि लडाखसारख्या दुर्गम लष्करी भा...

June 12, 2025 2:55 PM June 12, 2025 2:55 PM

views 8

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला – प्रधानमंत्री

तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.   तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापराचे असंख्य फायदे झाले आहेत. त...