October 17, 2025 3:55 PM October 17, 2025 3:55 PM

views 25

डिजिटल अटकेच्या नावाखाली व्यावसायिकाचे ५८ कोटी लंपास, तीघांना अटक

डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लंपास करणाऱ्या ३ आरोपींना सायबर पोलीसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकारादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉलवरून धमकी दिली होती. धमकीच्या धाकामुळं या दाम्पत्यानं १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी मागणी केलेले ५८ कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले होते. पण फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या दाम्पत्यानं सायबर पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी आरोपीं...

October 17, 2025 12:59 PM October 17, 2025 12:59 PM

views 52

‘डिजिटल अटक’ या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची दखल

डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे. सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून त्यांना डिजिटल अटकेत ठेवलं आणि एक कोटींहून अधिक रुपये उकळल्याचा आरोप या महिलेने केला होता. बनावट आदेशांचा वापर करून अशा प्रकारे होणारी आर्थिक फसवणूक न्यायव्यवस्थेवरच्या नागरिकांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरू शकते, अ...